प्राचीन आर्यसंस्कृति – २
पुराणांत व इतिहासग्रंथांतहि भाऊबहिणीच्या लग्नाचे उल्लेख आलेले आहेत. पुराणांत राजांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. त्यांत राजाची राणी ही कोणत्या राजाची कन्या हे दिलेले असते. काही ठिकाणी पितृकन्या असा उल्लेख असतो, ती कन्या पितृलोकांतील असा अर्थ टीकाकार करतात, पण तो अर्थ बरोबर नाही. बापाची मुलगी हा खरा अर्थ आहे. म्हणजे लग्न सख्ख्या बहिणीबरोबर किंवा सावत्र बहिणीबरोबर झाले …